Good News : व्यायामाची आवड असलेले व सध्या ठाणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विकास गजरे हे आता आयर्न मॅन अर्थात लोहपुरुष म्हणून ओळखले जाणार आहेत.
मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी गावचे रहिवासी असलेले व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेल्या गजरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून तर माध्यमिक शिक्षणही ग्रामीण भागातून झाले आहे.
कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस क्लब तर्फे आयोजित लोहपुरुष ट्रायथलॉन या स्पर्धेत गजरे हे इतर ९९ स्पर्धकांसह जिद्दीने उतरले होते. ही स्पर्धा तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती.
पहिल्या टप्प्यात कोल्हापूरच्या प्रसिद्ध राजाराम तलावात १.९ किलोमीटर पोहणे, दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर – बेंगलोर महामार्गावर ९० 1 किलोमीटर सायकलिंग व तिसऱ्या टप्प्यात ३.२१ किलोमीटर अर्धमॅरेथॉन पूर्ण करणे अशी ही स्पर्धा होती.
स्पर्धेसाठी निर्धारीत वेळ १० तास इतका होता. ही स्पर्धा सकाळी ६.३० वाजता सुरु झाली व गजरे यांनी दुपारी २.५५ ला ही स्पधी ८ तास २५ मिनिटात यशस्वीपणे पूर्ण केली व आयर्न मॅन हा किताब पटकावला.
यापूर्वी गजरे यांनी ९० किलोमीटर अंतर १२ तासात पूर्ण करणे ही अट असलेली जगातील सर्वात कठीण व जुनी मॅरेथॉन ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण केलेली आहे.