पालकमंत्र्यांची मोठी घोषणा; मिळणार ‘एवढे’कोटी

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- आदिवासी भागातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी थेट त्या गावांना निधी देण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे.

यानुसार नगर जिल्ह्यातील 166 गावांना 3 कोटी 29 लाख रुपये मिळणार असून सर्वाधिक लाभ अकोले तालुक्याला मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

या निधीतून गावांमध्ये विविध पायाभूत सुविधांचा विकास, वनहक्क अधिनियम व पेसा कायद्याची अंमलबाजवणी, आरोग्य, स्वच्छता व शिक्षण, वनीकरण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारणाची विविध कामे,

वनतळी, वन्यजीव पर्यटनास चालना देणारे उपक्रम, वन उपजिविका आदी विविध कामे करता येणार आहेत. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील

(पेसा क्षेत्र) 13 जिल्ह्यातील 5 हजार 982 गावांकरिता 5 टक्के थेट अबंध निधी योजनेचा 160 कोटी 73 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

लोकसंख्येनुसार हे निधी वितरण करण्यात आले आहे. हा निधी ग्रामसभांनी संबंधीत आदिवासी गावांतील विविध विकास कामांकरिता खर्च करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts