अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : मोठी बातमी ! रेखा जरे खून खटल्यासंदर्भातील कामकाज करण्यास सरकारी वकिलांनी दर्शवली असमर्थता, कामकाज काढून घेण्याबाबत पत्र

Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजलेले रेखा जरे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरु झालेली आहे. आरोपी बाळ बोठे सह आणखी काही यात आरोपी आहेत. दरम्यान आता याबाबत एक महत्वाची अपडेट आली आहे.

रेखा जरे खून खटल्यासंदर्भातील कामकाज करण्यास सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी असमर्थता दर्शवली आहे. इतर न्यायालयात सुरू असलेल्या खून खटल्यांच्या कामकाजामुळे रेखा जरे खून खटल्याच्या नियमित (दर दिवशी) सुनावणीसाठी उपस्थित राहता येत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

या खटल्याचे कामकाज काढून घेण्याबाबत त्यांनी विधी व न्याय विभागाला पत्र दिले आहे. यासोबतच त्यांनी जामखेड येथील विशाल सुर्वे खून खटल्याचेही कामकाज पाहण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबत त्यांनी न्यायालयाला आणि विधी व न्याय मंत्रालयाला कळवले आहे.

रेखा जरे खून खटल्याची सुनावणी दर दिवशी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, दर सोमवारी, मंगळवारी व शुक्रवारी इतर खटल्यांच्या नियमित सुनावण्या सुरू आहेत. त्यामुळे जरे खून खटल्याची सुनावणी बुधवारी आणि गुरूवारी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली होती.

इतर खटल्यात व्यस्त असल्यामुळे ते जरे खटल्यात मागील सुनावणीवेळी उपस्थित नव्हते. याचा फायदा घेऊन आरोपी बाळ बोठे याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. कामकाजात व्यस्त असल्याने नियमित सुनावणीस हजर राहणे शक्य नाही. त्यामुळे जरे आणि सुर्वे या दोन खटल्याचे कामकाज काढून घ्यावे, असे त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts