अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar Politics:- अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे नेहमीच वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आहेत खासदार म्हणून संसदेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रश्न मांडताना त्यांनी आक्रमकपणा दाखवला आहे.
तर वयोश्री योजने मधील वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात वयोवृद्ध नागरिकांमध्ये रमून जाऊन अगदी त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याशी अपुलीकने गप्पागोष्टी करणारे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं आगळेवेगळे रूपही नागरिकांनी पाहिलं आहे.
मात्र आता त्यांचे आणखी एक रूप जे कधीच कुणी पाहिलं नसेल ते म्हणजे स्वयंपाक घरातील त्यांनी केलेले पदार्थ आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मंगळवारी रात्री झी मराठीवर किचन कल्लाकार या मालिकेत सुजय विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सहभाग असलेला आजचा एपिसोड हा पाहण्याजोगा असणार आहे.
त्यामुळे काही तासानंतर त्यांचं आगळेवेगळे रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. किचन कल्लाकार मध्ये कोणी महाराजांना खुश करून बक्षीस मिळविले हे पण आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या स्वयंपाका बरोबरच त्यांना कार्यक्रमा दरम्यान मिळालेल्या शिक्षा आणि त्यांनी केलेली कामगिरी या सुद्धा पाहण्याजोग्या ठरणार आहेत.