अहमदनगर बातम्या

जामखेड गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Ahmednagar News : जामखेड येथील गोळीबार प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा, ता. जामखेड) व कुणाल जया पवार (रा. कान्होपात्रा, नगर, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

३ मार्च २०२४ रोजी जामखेड येथील मुकादम आबेद बाबूलाल पठाण यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात फिर्यादी जखमी झाले होते. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०४, ३४ सह आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे खुनाचा प्रयत्न अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींना विंचरणा नदीपात्रा जवळील वाकी शिवारातील ऊसाच्या शेतातून अटक करण्यात आली. दोघा आरोपींविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, पोसई. तुषार धाकराव, बापूसाहेब फोलाने, रविंद्र कर्डिले,

विश्वास बेरड, विशाल दळवी, रोहित मिसाळ, बबन मखरे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, रणजित जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts