अहमदनगर बातम्या

नगर – पुणे इंटरसिटी ट्रेन बाबत मोठी अपडेट ; लोढा यांचे रेल्वेमंत्री वैष्णव यांना साकडे

Ahmednagar News : अहमदनगर – पुणे अशी अंतर शहर रेल्वे (इंटरसिटी ट्रेन) सुरू करावी. या मागणी संदर्भात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू तसेच संपादक सुरेश चव्हाणके यांच्याशी चर्चा केली. पुणे – नगर रेल्वे सुरू करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पुणे – अहमदनगर अंतर शहर रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी. या मागणीचे निवेदन वसंत लोढा यांनी रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांना दिले.आहे तसेच शहर विकासासाठी इंटरसिटी रेल्वे सुरू होणे आवश्यक असल्याचे देखील यावेळी त्यांनी नमूद केले आहे.

विविध कामांसाठी प्रवाशांना दररोज नगर-पुणे – नगर असा प्रवास करावा लागतो. मात्र गर्दी आणि वाहतुकीची साधने नसल्यामुळे नागरिकांना याठिकाणी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. क्षेत्रफळानुसार अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा मानला जातो.

पुणे आणि अहमदनगर या अंतर शहर रेल्वेची शहरातून सुटण्याची वेळ सकाळी ६.३० आणि संध्याकाळी ७ वाजता असेल. तर लोकांचा दररोज त्यांच्या इच्छित स्थळी जाण्याचा प्रश्न सुटणार आहे, त्याचसोबत वेळेची देखील मोठी बचत होईल.

सर्वसामान्यांना रेल्वेचा प्रवास करनेही सोयीचे होणार आहे. नगर पुणे १२० किमी अंतरासाठी शिवशाही सारख्या खाजगी व सरकारी बसचे भाडे ३५० च्या आसपास आहे.

महामंडळसारख्या वाहनाचे भाडे २५० ते ३०० इतके आहे जे उच्च आहे. त्यामुळे असा प्रवास रोज करणे परवडत नाही. जर पुणे-नगर रेल्वे सुरू झाल्यास लोकांचा प्रवास सुखकर होईल, भाडे वाचेल आणि रेल्वेचा महसूल वाढेल. हा प्रस्ताव अनेक अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास लाखो लोकांचे प्रश्न आपोआपच सुटतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts