Ahmednagar news : जातीजातीत भांडणे लावणे, नागरिकांना खोटी आश्वासने तसेच खोटा प्रचार करून सत्ता मिळविण्याचे भाजपाचे काम आहे. मात्र हे खोटारडे व जातीपातीचे राजकारण फार काळ चालणार नाही.
राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर मतदार संघातील राहुरी तालुक्यातील ३२ गावातील मुसळवाडी येथे जनसंवाद यात्रेदरम्यान आयोजित बैठकीत आ. कानडे बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, अंकुश कानडे,
माजी नगरसेवक अशोक कानडे, राहुरी बाजार समिती संचालक रखमाजी जाधव, नानासाहेब रेवाळे, अशोक भोसले, लोकनियुक्त सरपंच अमृत धुमाळ, उपसरपंच किशोर जोशी, अॅड. रावसाहेब करपे आदी उपस्थित होते.