अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून बदनामी करत लग्न मोडणार्या ज्ञानदेव भाऊसाहेब हराळ (रा. गुंडेगाव ता. नगर) याला नगर तालुका सुपा पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केले.
त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पीडित तरूणीने फिर्याद दिली होती.
नगर तालुक्यातील एका गावामध्ये राहणार्या तरूणीवर एमआयडीसी परिसरात अत्याचार केला होता. अत्याचार केल्याने तरूणीला गर्भधारणा झाली. त्याचे सोनोग्राफी रिपोर्ट काढण्यात आले.
दरम्यानच्या काळात तरुणीचे दुसर्या मुलासोबत लग्न जमले. हराळ याने तरुणीसोबत लग्न जमलेल्या मुलाला सोनोग्राफी रिपोर्ट व्हाट्सअप व इन्स्टाग्रामवर पाठविले. तिची बदनामी करत जमलेले लग्न मोडले.
तशी फिर्याद पीडित तरूणीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.