Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करून स्वतंत्र कोपरगाव जिल्हा करावा, त्यासाठी विधानसभेत आ. आशुतोष काळे यांनी लक्षवेधी मांडवी, अशी मागणी येथील जय हिंद विचार मंचचे अध्यक्ष किशोर चोरगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव हे ऐतिहासिक व पौराणिक समृद्धीच माहेरघर आहे. गोदावरी नदी, आंतरराष्ट्रीय काकडी विमानतळ आहे. समृद्धी महामार्ग, दोन सहकारी साखर कारखाने आहे. तालुक्यात तीन दूध संघ असलेल्या दूध संकलनाचे मोठे केंद्र व शैक्षणिक हब आहे.
तसेच जागतिक देवस्थान दैत्य गुरू शुक्राचार्य, शृंगेश्वर मंदिर, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज समाधी, श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन स्थान रामदासी महाराज मंदिर आहे,
असा एक ना अनेक प्रकारे सर्वांगिण पद्दतीने कोपरगावात समृद्धी असल्याने कोपरगावच जिल्हा झाला पाहिजे, अशी मागणी या आधीच करायला हवी होती, परंतु आतातरी कोपरगाव जिल्हा व्हावा, यासाठी विधानसभा अधिवेशनात मागणी करावी, असे किशोर चोरगे यांनी निवेदनात म्हटले आहे.