अहमदनगर बातम्या

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे नगरमध्ये सेलीब्रेशन…!

Ahmednagar News:आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंच निवड, या निर्णयाला शिंदे सरकार मंत्रिमंडळाने मंजुरी देत त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या निर्णयाचे नगर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच कार्यकर्त्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंच सदस्यांमधून निवडला जात असे मात्र यापुढील काळात सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे सरपंच निवडीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होत होता, तसेच घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांना पदापासून वंचित राहावे लागत होते;

मात्र थेट सरपंच निवडीने सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या मतांचे महत्त्व वाढणार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात असून, या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

तरुण मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात मात्र थेट सरपंच निवडीने सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.थेट जनतेतून सरपंच निवडणूक निर्णयाचे स्वागत नगर तालुक्यात करण्यात आले यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे पाटील,यांच्यासह तालुक्यातील सरपंच व उपसरपंच तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts