अहमदनगर बातम्या

बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत बदल ; ‘हा’ असेल वाहतुकीचा मार्ग..

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त अ.नगर सायकलिंग क्लब व कल्पतरु ग्रुपच्या वतीने दि.५ जानेवारी रोजी नगर सायक्लोथॉन राईडचे आयोजन करण्यात येणार आहे.या कालावधीमध्ये वाहतुकीमुळे सायकलपटूंची गैरसोय होवु नये तसेच सायकलपटूंच्या सुरक्षिततेस धोका पोहोचू नये यासाठी सकाळी ६ ते दुपारी ११ वाजे पर्यंत बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत बदल केले आहेत.

दरेवाडी हरपाल स्टेडियम गेटर नं.४ अ) छत्रपती शिवाजी महाराज चौक (वाळुंज), पाथर्डी अहिल्यानगर मार्गावरील बायपास लिंक रोड चांदबीबी महाल ते अरणगाव चौक व बाबासाहेब आंबेडकर चौक,अरणगाव पर्यंतच्या वाहतुक मार्गात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी खालील प्रमाणे बदल केले आहेत.

केडगाव बायपास कडुन (अरणगाव बायपास रेल्वे पुल वाळुंज बायपास-चांदबीबी महाल) पाथर्डीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग – केडगाव बायपास कडुन (अरणगाव बायपास रेल्वे पुल वाळुंज बायपास चांदबीबी महाल) पाथर्डीकडे उजवी कडील लेनवरुन एकेरी मार्गे पाथर्डीकडे – दरेवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक (वाळुंज) कडे जाणाऱ्या सर्व वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग – दरेवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक (वाळुंज) कडे उजवीकडील लेनवरुन एकेरी मार्गे.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni

Recent Posts