अहमदनगर बातम्या

अंगावर भिंत पडल्याने चिमुरडीचा मृत्यू; तिघे जखमी

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  अल्पवयीन मुलीच्या अंगावर भिंत पडल्याने श्रीरामपूर तालुक्यातील भोकरच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. परी अनिल शिंदे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे.

बुरूडगाव (ता. नगर) शिवारातील आझादनगर येथे ही घटना घडली. यामध्ये अन्य तीन मुले जखमी झाले आहेत. लक्ष्मी राजू चौघुले (वय 9), सौरभ नवनाथ पवार (वय 13) आणि अनिकेत सुनील मोरे (सर्व रा. बुरूडगाव ता. नगर) अशी जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत.

बुरूडगाव येथील आझादनगर भागात तुकाराम मोरे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तुकाराम मोरे यांच्याकडे त्यांच्या मुलीची मुलगी (नात) परी अनिल शिंदे राहत होती.

परी, लक्ष्मी, सौरभ व अनिकेत हे चौघे येथील कानिफनाथ मंदिराजवळ सायंकाळी खेळत होते. त्यावेळी मंदिराची भिंत अचानक कोसळली यात परी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य तीन मुले जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts