अहमदनगर बातम्या

लवकरच नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल : खा. विखे

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जल जीवन मिशन अंतर्गत सर्वसामान्य लोकांना पाण्याची सोय झाली असून, याच हळगाव गावात जल जीवन मिशन अंतर्गत तीन कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. त्यामुळे लवकरच लोकांची पाण्याची सोय होणार आहे.

आडगाव गावामध्ये विजेचा प्रश्न असेल किंवा डीपीचा प्रश्न असेल असे विविध प्रश्न येत्या काळात सोडवणार आहे. तसेच हळगाव व पंचक्रोशीतील ज्या ग्रामस्थांच्या कुणबी दाखला प्रमाणपत्रासाठी बीड जिल्हा येथे नोंदी आहेत,

अशा नागरिकांच्या दाखल्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून येत्या दोन महिन्यात आपल्या नोंदी मिळून जातील असे आश्वासन खा. विखेंनी दिले.

हळगाव येथे ३ कोटी ७५ लक्ष रुपयांचा विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दूध दर वाढीबाबत अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करून दूध उत्पादकांना दिलासा दिला जाईल असा शब्द देखील खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला.

यावेळी आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे, माजी सभापती डॉ. मुरूमकर, सरपंच ढवळे ताई, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, सरपंच किसन ढवळे, माजी उपसभापती अंकुश ढवळे,

माजी सरपंच दिगंबर ढवळे, नवनाथ ढवळे, माजी संचालक करण ढवळे, भीमराव कापसे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts