अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- एका सिव्हील कॉन्ट्रक्टरला जातीवाचक शिवीगाळ करणे महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या उपअभियंता किशन भिमराव कोपनर (रा. शिलाविहार रोड, सावेडी) यांना चांगलेच महागात पडले आहे.
त्यांच्या विरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्ट्रक्टर ज्ञानेश्वर ग्यानोजी सोनवणे (वय 41 रा. दरेवाडी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 11 जानेवारी 2022 रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान सावेडीतील शिलाविहार रोडवरील एका चहाच्या हॉटेलमधून मित्राबरोबर चहा पिवुन निघालो असता श्रीराम चौकाकडून आलेली कार माझ्याजवळ येऊन उभी राहिली.
त्यामधील व्यक्तीने कारची काच खाली करून माझ्याकडे पाहून मोठ्या आवाजात जातीवाचक शिवीगाळ केले. माझ्या विरूध्द तक्रार करणार्या लोकांना मदत करतो काय ? तुझ्याकडे बघतोच, असे म्हणत तेथून निघुन गेला.
सदरचा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा, अहमदनगर शहरातील उपअभियंता कोपनर असल्याचे मी ओळखले आहे, असे सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.