अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : मोहरमच्या मिरवणुकीत सवारीला धक्का दिल्याच्या कारणावरून हाणामारी

1 year ago

Ahmednagar News : दरवर्षीप्रमाणे उत्साहात निघणाऱ्या मोहरमच्या मिरवणुकीत सवारीला धक्का दिल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याने यावर्षी गालबोट लागले. या हाणामारीत एक जण जखमी झाला.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मोहरमनिमित्त संगमनेर शहरातील जेधे कॉलनी येथून सालाबादप्रमाणे मोहरम कालावधीमध्ये सय्यदबाबा दर्गाह अशी सवारी काढण्यात येते.

शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास अश्पाक अल्ताफ शेख (राहणार जेथे कॉलनी) हा सवारी घेऊन चुलतभाऊ समीर राजू शेख, जमीर राजु शेख व इतरांसोबत जेथे कॉलनी, मेन रोड, सय्यदबाबा चौक असे जात होता.

समीर राजु शेख याच्या अंगात सवारी येत असल्याने त्याला धरुन रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सय्यदबाबा चौक येथून मोगलपुरा मज्जीदकडे ते जात होते. रस्त्यामध्ये तलहा करीम शेख (रा. जोर्वेनाका, संगमनेर) याने समीर यास धक्का दिला.

तलहा यास तु सवारीला धक्का का मारला, असे विचारले असता त्याने हातात असलेले फायटर अश्फाक शेख याच्या डोक्यात मारले या हाणामारीत अश्पाक याच्या डोक्यास जखम झाली. सवारी परतल्यानंतर झालेला प्रकार त्याने आपल्या वडिलांना सांगितला. तलहा करीम शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे…

Recent Posts