Ashutosh Kale : मुंबईमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
कांदा निर्यातीबरोबरच सोयाबीन, कापूस व इतर पिकांसाठी योग्य घोरण ठरवा, पिक विम्याची उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई द्या, कर्जमाफी व अनुदान योजनेपासून वचित शेतकऱ्यांना लाभ द्या,
उर्जा विभागाच्या शेतकरी हिताच्या योजना पुन्हा सुरु करा, सिंचनाची पाणी पट्टी कमी करा, बिबट्याच्या धास्तीतून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी उपाय योजना करा, ५ रुपये दुध अनुदान दुध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मिळावे,
२०२१- २०४१ या वीस वर्षाच्या रस्ते नकाशा कामाला गती द्यावी आदी मागण्या आ. आशुतोष काळे यांनी केल्या. सरकारच्या दृष्टीने शेतकरी व ग्राहक हे दोघेही महत्त्वाचे आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आपल्या पिकाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. तसेच ग्राहकाला देखील तो शेतमाल खरेदी करताना अधिकचे पैसे मोजावे लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
मागील वर्षी झालेली अतिवृष्टी, सततचा पाऊस त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई तातडीने मिळावी. पिक विमा कंपन्यांनी ७५% पिक विम्याच्या रक्कमेबाबत केंद्र सरकारकडे अपील केले आहे. त्यावर तातडीने तोडगा काढून ७५% रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात लवकरात कशी पडेल यासाठी सरकारने प्रयत्न करावा,
दोन लाख कर्ज असलेल्या वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. त्याबरोबरच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान लवकरात लवकर मिळावे. वाढीव पाणी पट्टी कमी करावी,
थकबाकीसाठी सवलत योजना आखावी, उर्जा विभागामार्फत ए.सी.एफ. योजना सुरू करावी, सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याचा नकाशा तातडीने पूर्ण करावा. वाढत्या बिबट्यांची संख्या नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात,
दुधाचे पाच रुपये जाहीर झालेले अनुदान तातडीने वर्ग करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधल्यामुळे कोपरगाव मतदार संघासह राज्यातील शेतकऱ्यांकडून आ. काळेंच्या अभ्यासूपणाचे कौतुक होत आहे.