अहमदनगर बातम्या

कापड दुकानदाराच्या मुलाची महिलेस मर्डर करण्याची धमकी; पाचजणांवर अ‍ॅट्रॉसिटी : नेमका काय आहे प्रकार

Ahmednagar News : एक कापड दुकानदाराच्या मुलाने तू माझी बदनामी का करते, मला सर्व माहीत आहे, माझी जर आता बदनामी केली तर तुझा मर्डर करेल. अशी धमकी देत कापड दुकानात कामास असलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद पीडित महिलेने दाखल केली आहे.

यावरून कापड व्यावसायिकाच्या मुलासह कुटुंबातील पाच जणांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधात्मक कायद्यासह इतर कलमान्वये राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान त्या कापड दुकानदाराने दिलेल्या फिर्यादीवरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्या महिलेच्या ६ नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राहाता शहरातील लोकरुचीनगर येथे महामार्गालगत असणाऱ्या एका कापड दुकानात कामाला असणाऱ्या महिलेला आठ दिवसांपूर्वी दुकान मालकाचा मुलगा सार्थक चोरडिया याने फोनवरून म्हणाला, तू माझी बदनामी का करते.

मला सर्व माहीत आहे. आता बदनामी केली तर तुझा मर्डर करेल. जे शरीरसुख तिच्याकडून मला भेटले नाही ते तुझ्याकडून करून घेईल असं बोलून महिलेला शिवीगाळ केली. नंतर दि. १४ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संबंधित महिला विहिरीवर आत्महत्या करण्याच्या इराद्याने गेली होती.

तेव्हा तिच्या नातेवाईकांनी विहिरीवरून पकडून तिला घरी आणले होते. यावेळी तिने दुकान मालकाचा मुलगा सार्थक चोरडिया याने माझ्यासोबत फोनवर जे बोलला ते मी माझ्या भावांना सांगितले त्यानंतर माझे भाऊ व मी स्वतः असे आम्ही त्या कापड दु‌कानात सार्थकला जाब विचारण्यासाठी गेलो. तेथे आम्ही बोलत असताना अचानक सार्थकने आम्हाला मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर तेथे लाबेश चोरडिया, दिनेश चोरडिया, कमलेश चोरडिया, निलेश चोरडिया आले व त्यांनी आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. दरम्यान आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली.

यावेळी झालेल्या मारहाणीत माझा भावाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. दुसऱ्याच्या पायाला व बरगडीत मार तर तिसऱ्यालाही बरगडीत आणि पाठीला मार लागला. त्यानंतर आम्ही भावांना उपचारासाठी शिर्डी येथील साईसुपर हॉस्पिटल येथे दाखल केले.

महिलेच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी सार्थक चोरडिया, लाभेश चोरडिया, दिनेश चोरडिया, कमलेश चोरडिया, निलेश चोरडिया या पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तर दिनेश निलेश चोरडिया याने सचिन बोरगे यांच्यासह सहा साथीदारांविरोधात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद पोलिसांत दिली. या फिर्यादीवरून सचिन बोरगेसह सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अभंग करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts