अहमदनगर बातम्या

खासगी कारखाने काढणारे सहकाराचे मारेकरी!

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-   सहकारातून मोठे झालेल्या अनेकांनी खासगी कारखाने काढले. ते काढण्यासाठी सहकारी कारखाने विकत घेतले. अशांनी आम्हाला सहकार वाचविण्यासाठी काय करावे, हे शिकवू नये.(amit shah)

अशी टीका केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. लोणी प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकार परीषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या सहकार चळवळीला मदतीची गरज आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार खाते काढले आहे. हे खाते जसे सहकाराला बळ देईल, तसे या चळवळीतील दोषही काढेल; परंतु सहकार चळवळीवर ही वेळ का आली?

असा प्रश्न उपस्थित करत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी मोदी सरकारने पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन केले. तेव्हा अनेकांनी या मंत्रालयाची कालसुसंगतता काय?

असा सवाल केला. त्यांना उत्तर देण्यासाठी मी इथे आलो आहे. आज महाराष्ट्रातील सहकार वाचला पाहजे, असा गळा काढणारेच खासगी कारखाने काढून बसले आहेत.

सहकारासाठी अडचणीचा काळ असताना प्रवरानगरचा कारखाना यशस्वी सुरू आहे. महाराष्ट्रात काय होणार, सहकारात काय होणार, महाराष्ट्रातील जे सहकारी कारखाने संकटात आहेत,

त्यांना पुन्हा उभे करण्याचे काम केंद्र करणार आहे. सहकारी कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. त्यांचे खासगीकरण होणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ. असे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts