अहमदनगर बातम्या

आ. निलेश लंकेंच्या मतदारसंघात दीड हजार कोटींची विकासकामे करणार ! अजित दादांची पारनेरमध्ये मोठी घोषणा

Ahmednagar News : येत्या वर्षभरात आमदार निलेश लंकेंच्या मतदारसंघात १५०० कोटींची विकासकामे करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पारनेर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते ‘माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रे’चा प्रारंभ झाला.

यावेळी अजित पवार यांनी १५०० कोटींच्या विकासकामांची मोठी घोषणा केली. यावेळी पवार म्हणाले, राज्याचे अर्थमंत्रिपद सध्या माझ्याकडे आहे. ४ वर्षांपूर्वी तुम्ही नीलेश लंकेंना निवडून दिले. पुढील निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे.

मी जेव्हा नीलेश लंकेंच्या प्रचार सभेला येईल,त्यावेळी लंकेंच्या मतदारसंघात १५०० कोटींची विकासकामे झाल्याचे दाखवून देईल. पारनेरमध्ये ३३३ ट्रान्सफॉर्मरची कामे नीलेश लंकेंच्या माध्यमातून मार्गी लागले.

यासारखी अनेक कामे झाले आहेत. आता १५०० कोटींची कामे येथे होतील. महाराष्ट्राची जनता २८८ लोकप्रतिनिधी निवडून देते पण जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण म्हणजे नीलेश लंके आहे असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

यावेळी संपूर्ण भाषणात अजित पवार यांनी आमदार लंके यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. त्यांनी त्यांचा आधुनिक श्रावण बाळ असा उल्लेख केला. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री आर.आर आबांची देखील आठवण काढली. ते म्हणाले की, आर.आर आबांची आधुनिक गाडगे बाबा म्हणून ओळख निर्माण झाली होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आ. लंके यांची ओळख झाली आहे असे अजित पवार म्हणाले.

आरक्षण मागणीमुळे जातीजातींमधील अंतर वाढले सध्या वेगवेगळे लोक आरक्षणाची मागणी करत आहेत. आरक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण पुरोगामी महाराष्ट्रात आपण शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपत आहोत.

या आरक्षणाच्या मागणीमुळे आणि मोर्चामुळे सामाजिक आरोग्य बिघडत चालले आहे, त्यामुळे जाती-पातीचा भेद वाढत आहे, मात्र राजकारण करण्यापेक्षा सामाजिक आरोग्य राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts