Ahmednagar Politics News : अहमदनगरच्या राजकारणात सध्या अनेक उलथापालथ दिसत आहेत. आगामी काळात यात आणखी वाढ होईल असे चित्र सध्या दिसत आहे. अहमदनगर लोकसभेला आ. निलेश लंके उभे राहणार नाहीत असे गृहीत धरून लोक दुसऱ्या नावाची चर्चा करू राहिले होते.
परंतु आता आ. निलेश लंके यांच्या एका राजकीय डावपेचामुळे पुन्हा एकदा आ. निलेश लंके हे लोकसभेला उभे राहतील व ते शरद पवार गटाकडून उभे राहतील असे संकेत मिळू लागल्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
याचे कारण म्हणजे नगर शहरात आयोजित केलेलं शरद पवार यांचे शिलेदार अमोल कोल्हे यांचे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य. १ ते ४ मार्च दरम्यान नगर येथे आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी या खा. डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महानाट्याचे आयोजन शहरातच का?
‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन नगर शहरात (केडगाव) मध्ये करण्यात आले आहे. विधान सभेचा विचार केला तर शहराचा काही संबंध पारनेरशी येत नाही. परंतु लोकसभेला मात्र येतो. त्यामुळे या महानाट्याचे आयोजन शहरात करून तेथील मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम आ. लंके यांना करायचे आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
खा. अमोल कोल्हे यांचे हे महानाट्य
खा. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे नेते. तर आ. लंके हे अजित पवार गटाचे. त्यामुळे जर हा कार्यक्रम राजकीय अनुशंघाने प्रेरित असेल तर कोल्हे हे लंके यांचा पर्यायाने अजित पवारांचा प्रचार येथे करतील असे वाटत नाही.
मग ते याठिकाणी लंके यांचे राजकीय जीवनाविषयी काही बोलले तर मग याचा अर्थ सामान्यांनी काय घ्यायचा हा प्रश्नच आहे. परंतु असे होईल की नाही हे येणारा काळ सांगेल. तसेच निलेश लंके यांनी अमोल कोल्हे यांचे महानाट्य आयोजित केल्याने ते शरद पवार गटात जातील असे म्हटले जात आहे.
महानाट्य म्हणजे लोकसभेचा प्रचाराचा नारळ?
‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन पारनेर मतदार संघात नव्हे तर नगर शहरात (केडगाव) करण्यात आले आहे. त्यामुळे याद्वारे लोकसभा मतदार संघातील मतदारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न लंके यांचा आहे का? खा. सुजय विखे यांच्या व्रिरोधात लोकसभेला उभे राहण्याचा व एक प्रकारे हा लोकसभेच्या प्रचाराचा नारळ आहे का? अशा अनेक शंका सध्या नागरिकांना येऊ लागल्या आहेत.
लोकसभेबाबतचा चेंडू अजित पवार यांच्या कोर्टात
माझ्या नेतृत्वाने जबाबदारी दिली तर मी ती जबाबदारी वशस्वीरित्या पार पाडण्यास तयार असल्याचे सांगत जा. नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचाबतचा चेंडू अजित पवार यांच्या कोर्टात टोलावला. दरम्यान, विखे हे मोठे आहेत.
गेल्या पन्नास वर्षांपासून पिढ्यान् पिढ्या जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नेतृत्व करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणे योग्य नाही असे म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महानाट्याचा राजकारणाशी काय संबंध ?
तुम्ही अजितदादा पवार गटाचे आहात.१ मार्च रोजी तुम्ही शरद पवार गटाच्या खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या महानाटयाचे आयोजन केले आहे याविषयी विचारले असता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी या महानाट्याचे जायोजन करण्यात आले आहे. दुरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरापर्यंत संभाजी महाराजांचे विचार पोहचले.
हे विचार प्रत्यक्ष पहावयास मिळावेत ही आमची भूमिका आहे. याच्याशी राजकारणाचा काय संबंध? एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात काम करतो. आणि तो एखाद्या पक्षात असेल तर तो चित्रपट त्या पक्षाचा अथवा पार्टीचा झाला का ?
आज कित्येक सेलिब्रेटी राजकारणाशी निगडीत आहेत. याचा अर्थ त्या पक्षाच्या विचाराच्या लोकांनीच त्यांच चित्रपट पहायचे का ? दुसऱ्या विचारांच्या लोकांनी तो चित्रपट पहायचा नाही का असे प्रतीप्रश्न आ. लंके यांनी केला.
जनता विविध तर्ककुतर्कांच्या चर्चेत
जनता सध्या विविध तर्ककुतर्क करण्यात व्यस्त आहे. आ. निलेश लंके हे शरद पवार गटाकडून उभे राहतील व लोस्कभेला खा. सुजय विखे यांना टक्कर देतील अशी चर्चा सध्या सुरु आहे.
हे पण वाचा : डॉ. सुजय विखे स्पष्टच बोलले ! एकदा मला तिकीट मिळू द्या, राम शिंदे आणि निलेश लंके यांचा…