अहमदनगर बातम्या

आमदार निलेश लंकेंच्या मनात चाललंय काय ? अजितदादांच्या कार्यक्रमात फोटो शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे !

Ahmednagar News : आज अहमदनगर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व आ.निलेश लंके हेच चर्चेचा विषय आहेत. त्याचे कारण असे की, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पारनेर दौऱ्यावर होते. आ. निलेश लंके हे दरवर्षी मतदार संघातील लाखो महिलांना मोहटादेवी दर्शन घडवत असतात.

यावर्षी देखील हाच उपक्रम राबवण्यात आला. याचसाठी पवार पारनेरमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते ‘माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रे’चा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या वेळी एका पोस्टरने सगळ्याच लक्ष वेधले. हा बॅनर अजित दादांच्या कार्यक्रमाचा होता. परंतु यावर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

आ. लंके व शरद पवार

अजित पवार गट राष्ट्रवादीतून फुटून सत्तेत गेल्यानंतर आ. लंके हे अजित पवारांबरोबर त्यांच्या गटात सहभागी झाले. परंतु आ. निलेश लंके यांचे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असणारे नाते सर्वश्रुत आहे. शरद पवार ज्यावेळी नगर दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी थेट आ.लंके यांचे घर गाठले होते.

त्यांचे सख्य, प्रेम हे सर्वाना माहीतच आहे. आता हीच चर्चा या बॅनरमुळे पुन्हा रंगली आहे. आ.लंके हे जरी अजित दादांसोबत असले तरी त्यांच्या मनात शरद पवार यांचे स्थान तितकेच अढळ आहे अशी चर्चा रंगली होती.

शरद पवारांच्या सूचना

मागे शरद पवारांनी माझा फोटो परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असा इशारा अजित पवार गटाला दिला होता. यावेळी अजित दादा गटाने आम्ही यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरू असे म्हटले होते.

अजित पवार यांची मोठी घोषणा

अजित पवार यांनी पारनेर मतदारसंघात दीड हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा केली. निलेश लंके यांच्या प्रचार सभेला जेव्हा मी येईल तेव्हा दाखवून देईल की, निलेशच्या मतदारसंघात १५०० कोटींची विकासकामे झाली आहेत.

महाराष्ट्राची जनता २८८ लोकप्रतिनिधींना निवडून देते, पण सजग लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण निलेश लंके यांनी आपल्या कृतीतून दिले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts