अहमदनगर बातम्या

आ. सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक तुला’

विविध व्यासपीठांवरून तरुणाईला शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्त्व पटवून देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या कारकि‍र्दीत एक अनोखा सन्मान त्यांना मंगळवारी प्राप्त झाला.

आमदार सत्यजीत तांबे शेवगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित ‘राजीव बुक फेस्ट २०२३’ या भव्य पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक तुला’ केली.

या पुस्तक तुलेसाठी वापरलेली पुस्तकं आता विविध संस्थांना आणि गरजू विद्यार्थ्यांना दान करण्यात येतील. या वेळी आमदार तांबे यांना ‘ज्ञान उपासना सन्मान’ प्रदान करण्यात आला.

पुस्तक हे माणसाचे आयुष्य घडवते. त्यामुळे वाचनसंस्कृती जपली पाहिजे. वाचन संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचं काम आ. सत्यजीत तांबे करत आहेत, अशी भावना या वेळी कलके यांनी व्यक्त केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts