अहमदनगर बातम्या

Ahmednagar City News : काँक्रीटीकरणामुळे रस्ते दर्जेदार होतील : महापौर शेंडगे

Ahmednagar City News : गेल्या काही कालावधीपासून शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. रस्त्यांच्या समस्यांबाबत नागरिकांची नेहमीच ओरड असते, यासाठीच शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचेही कॉक्रीटीकरण करण्यात येत असल्याने हे रस्ते दर्जेदार व टिकावू होतील.

नागरिकांच्या प्रश्नांचा विचार करुन त्यांना चांगल्या सुविधा देण्यावर आमचा सर्वांचाच भर आहे. ड्रेनेज, पाणी, स्ट्रीट लाईट, रस्ते याबरोबरच परिसराच्या विकासात भर घालणारे प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे.

स्टेशन रोड परिसरातील नगरसेवक प्रभागाच्या प्रश्नांसाठी नेहमीच जागृत राहून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतात, त्यामुळे या भागातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. स्टेशन रोड परिसरातील गेल्या काही महिन्यात अनेक विकास कामे झाली असल्याने प्रभाग समस्या मुक्त होत असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

नगरसेविका विद्या खैरे यांच्या प्रयत्नातून प्रभाग १५, रेल्वे स्टेशन परिसरातील अनंत हौसिंग सोसायटी येथील रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, दिपक खैरे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, अविनाश दाभाडे, सुधीर चपळगांवकर, सचिन सप्रे, प्रशांत घेरडे, शिरिष कुलकर्णी, संदिप सप्रे,

अशोकराव गोरे, के. डी. खानदेशी, नुर आलम, मुर्तुजा सय्यद, अशोक पटेल, संध्या दाभाडे, माणिक पुराणिक, रेखा उबाळे, सुनिता कुलकर्णी, लिला ओझा, अश्विनी कुलकर्णी, मनिषा चपळगांवकर, सुमन सप्रे, सुनंदा घेरडे, किशोरी चायल आदि उपस्थित होते. याप्रसंगी सभापती गणेश कवडे, संभाजी कदम आदिंनीही मनोगत व्यक्त केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts