काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर; गांधी जयंतीचे वेगवगेळे केले नियोजन

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- सध्या शहरातील पक्षांचे राजकारण पाहता दरदिवशी काहीतरी नवीनच विषयांबाबत नगरकरांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेनेपाठोपाठ आता शहरातील काँग्रेसमधील गटबाजी देखील चव्हाट्यावर आली आहे. 

याचे दर्शन आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये दिसून आली. शुक्रवारी महात्मा गांधीजींची जयंती दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे साजरी केली.

एका काँग्रेसने वाडिया पार्क मधील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथे केंद्र सरकार विरुद्ध धरणे आंदोलन केले.

तर दुसऱ्या काँग्रेसने महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बाजार समिती आवारात जाऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले.

यासंदर्भात एका काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे असे आहे की, आमची शहर काँग्रेस जुनी आहे व आम्ही राष्ट्रीय पुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो व शहर जिल्हा काँग्रेस वेगळी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

तर दुसऱ्या काँग्रेसचे म्हणणे असे आहे की, शहरात दोन गट कायम आहेत. शहरातील अन्य पक्ष या गटबाजीला खतपाणी घालत आहेत. मात्र आता एकदा बंदोबस्त करावा लागेल, असे त्यांचे म्हणणे होते.

दरम्यान, काँग्रेसमध्ये विखे गट असताना त्यावेळी विखे-थोरात असे दोन गट होते मात्र आता विखे भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यात केवळ थोरात समर्थक राहिले आहेत.

त्यातही नगर शहरात या समर्थकांमध्ये दोन-दोन गट असणे चुकीचे आहे, असे मतही यानिमित्ताने व्यक्त झाले. मात्र नगर शहरातील कॉंग्रेसचे दोन कार्यक्रम गटबाजीमुळे चर्चेत राहिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: up

Recent Posts