कोरोनाचा गर्भवती महिलांना असतो जास्त धोका; तज्ञ म्हणतात..

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच जण आपली काळजी घेत आहेत. कारण कोरोना हा एक संसर्गजन्य आजार आहे. म्हणून गर्भवती महिलांनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे.

वारंवार हात धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल किंवा टिशू पेपर धरणे, टिशू लगचेच डस्टबिन मध्ये टाकणे, सर्दी-खोकला झालेल्या व्यक्तीजवळ न थांबणे, अशी काळजी घ्यायला हवी.

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या अहवालानुसार गर्भवती महिलांना कोरोना या आजाराचा गंभीर धोका आहे.

सिन्हुआ वृत्तानुसार, हिस्पॅनिक आणि नॉन-हिस्पॅनिक अश्वेत गर्भवती महिलांवर गरोदरपणात या संसर्गाचा कमी अधिक प्रमाणात परिणाम झाला आहे.

सीडीसीने असे म्हटले आहे की कोविड -१९ संबंधित गंभीर आजाराचा धोका कमी करण्यासाठी गर्भवती महिलांना या रोगाच्या संभाव्य धोक्याबद्दल जागरूक असले पाहिजे.

२२ जानेवारी ते ७ जून दरम्यान गर्भवती महिलांमध्ये कोविड – 19 ची एकूण 8,207 प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना संसर्ग होण्याची भीती असलेल्या या काळात,

गर्भवती स्त्रियांनी नेहमीच्या नियमित तपासणीसाठीही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. काही शंका असतील तर फोन, ऑनलाइन माध्यमे यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

ज्या महत्त्वाच्या टप्प्यांवरील अल्ट्रासाउंड वगैरे टेस्ट असतील, फक्त तेवढ्या करून घेण्यापुरतेच बाहेर पडावे. गर्भवती स्त्रियांना खोकला, ताप वगैरे कोरोना संसर्गाची लक्षणे जाणवत असतील,

त्यांनी नुकताच परदेश प्रवास केला असेल किंवा प्रवास केलेल्या कोणा व्यक्तीशी त्यांचा संपर्क आला असल्यास त्यांनी लगेच परीक्षण करून घेऊन डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

गर्भारपणात पौष्टिक, सकस आणि समतोल आहार घेणे बाळाच्या वाढीसाठी व आईच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

समतोल आहार म्हणजे आपल्या जेवणात मुख्य प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, जीवनसत्त्व, क्षार आणि पाणी या सहा न्यूट्रीएंट्सचा समावेश करावा.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts