अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- जुलै महिन्यांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
मात्र,अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. राहाता तालुक्यात कोरोना पाय पसरू लागला आहे. राहाता तालुक्यात दिवसभरात 25 जणांना करोनाची लागण झाली आहे.
शहरात 10 तर शिर्डीत 10 रुग्ण सापडले असून 91 जणांची दिवसभरात रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे. राहाता शहरात एका करोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात दिवसभरात 91 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या आहेत.
यात 25 जणांना करोनाची लागण झाली असून राहाता शहरात 10 जण, शिर्डी 10 जण यात दोन जण कोपरगाव येथील आहेत. साकुरी 3 जण, लोणी 3 जणांचा समावेश आहे.
राहाता पालिकेत मंगळवारी 19 कर्मचारी करोना बाधित निघाले तर आज दिवसभरात 2 कर्मचार्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा आकडा 21 वर गेला आहे.
शहरातील इतरही पाच नागरिकांना करोनाची बाधा झाली असून तो शहरात पाय पसरू लागला आहे. शहरातील एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याने राहाता शहरात करोनामुळे मृतांचा आकडा पाचवर गेला आहे.
राहाता शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णामुळे शहरात तातडीने जंतूनाशक फवारणी करावी मात्र पालिका कार्यालय बंद असल्याने मुख्याधिकारी यांनी तातडीने याप्रश्नी लक्ष घालून शहरात आरोग्य व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
ज्या भागात रुग्ण सापडत आहे तेथे योग्य नियोजन करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने, नगरसेवक निवृत्ती गाडेकर, सचिन गाडेकर, बाळासाहेब गिधाड, दीपक सोळंकी यांनी केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved