अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. संगमनेर पाठोपाठ आता राहुरी तालुक्यात कोरोनाने कहर घालण्यास सुरुवात केली आहे.
काल एकाच दिवशी तब्बल नऊजणांना करोनाची बाधा झाल्याने आता नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे.
काल गुरूवारी राहुरी फॅक्टरी परिसरात चार तर म्हैसगाव येथे पुन्हा एक रूग्ण करोनाबाधित आढळून आला. तर वळण, कात्रड, सोनगाव येथेही कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
राहुरी फॅक्टरी येथील तिघेजण एकाच कुटुंबातील असून त्यातील कुटुंबप्रमुख हा तांदुळवाडी येथील बाधित रुग्णाचा चालक असल्याने त्याला व त्याच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली.
तसेच येथील एका तरुण शेतकर्याला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल काल सायंकाळी प्राप्त झाला. हा तरुण राहुरी येथील एका खासगी रुग्णालयात रक्तदाबाची तपासणी करण्यासाठी गेला होता.
तेथे वरवंडी येथील कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असल्याने तेथेच त्या तरुण शेतकर्याला कोरोनाची बाधा झाली. राहुरी शहराच्या मध्यवर्ती भागात राहणार्या एका व्यापार्याला कोरोनाची बाधा झाली.
खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत शेटेवाडी भागातील 36 वर्षीय तरुण बुधवारी बाधीत आढळला. तर शासकीय प्रयोगशाळेत राहुरी कारखाना येथील 45 वर्षीय तरुण चालक,
त्याची 38 वर्षीय पत्नी व 15 वर्षांचा मुलगा असे तिघेजण बाधित आढळले. राहुरी शहरासह ग्रामीण भागात अनेक होम क्वारंटाईन केलेले नागरिक खुलेआम मोकाट फिरत आहेत.
तर ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने राहुरी तालुक्यात करोनाने विळखा घालण्यास सुरूवात केल्याने नागरिकांनी महसूल आणि आरोग्य प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com