Ahmednagar News : पिकप गाडीमध्ये गोवंश जातीची २७ ते २८ जनावरे वाहतूक करण्यास मज्जाव केला असता रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून गोरक्षकला लोखंडे रॉडने मारहाण केल्याची घटना १ ऑगस्टला मध्यरात्री घडली. त्यानुसार पारनेर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी ज्ञानेश्वर अरुण विचारे (वय २६ वर्षे, रा. कर्जुले हर्या, पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
बेकायदेशीर गोवंश जातीचे जनावरे वाहतूक प्रकरणी, गोरक्षक हल्ला प्रकरणी मुनाव महबूब बेपारी, फयाज बेपारी, अफसर बेपारी, कासीम बेपारी (सर्व रा. बेल्हे, ता. जुन्नर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिकअप गाडीची पाहणी पोलिसांनी केली असता त्यामध्ये एक जर्शी गाय, एक म्हशीचे पार्डी, एक गीर जातीचा बैल व २५ लहान गाईचे वासरे दाटीवाटीने कोंबलेले आढळले.
फिर्यादीत म्हटले, की १ ऑगस्टला रात्री कर्जुले हर्या येथील हॉटेलमध्ये जेवण करत असताना मला मोबाईलवर सुशांत दाते (रा. अणे, ता. जुन्नर) यांनी फोन करून सांगितले की, आळेफाटाकडून एक पिकअप गाडीत गोवंश जातीचे जनावरे घेवून येत आहेत. तिच्या पुढे एक सफारी गाडी आहे. त्यानुसार मी मित्र दत्तात्रय भाऊसाहेब जगदाळे, ज्ञानेश्वर विलास आंधळे यांना फोन केले.
आम्ही तिघे कर्जुले हर्या शिवारातील नगर कल्याण रोडवरील हॉटेल जत्रासमोर थांबलो. आमच्या समोरून एक सफारी गाडी टाकळी ढोकेश्वर दिशेने गेली. त्यानंतर एक पिकअप गाडी आळेफाटाकडून जोरात आली. तीला आम्ही हात करून थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने गाडी न थांबवता निघून गेला. मी टाकळी येथील माझे मित्र अमोल दत्तात्रय अल्हाट यास फोन करून याची माहिती दिली.
नंतर ज्ञानेश्वर विलास आपना हॉटेल जवळ थांबले. मी व माझा जोडीदार दत्तात्रय भाऊसाहेब जगदाळे असे आम्ही मोटारसायकलवरून जात असताना रात्री १२.१५ च्या सुमारास एक सफारी गाडी समोरुन आली. ती आमचे जवळ थांबली व गाडीतील बसलेल्या एकाने धरा रे याला, असे जोरात ओरडला. त्यावेळेस गाडीत पाच ते सहा लोक दिसले. ते लोक सफारी गाडीतून उतरत असताना आम्ही मोटारसायकल घेऊन टाकळीढोकेश्वर गेलो. पुन्हा ती गाडी आमच्या मागे आली. आम्ही घाबरल्याने आमची मोटारसायकल बाजूस असलेल्या हॉटेल सप्तमीकडे घेऊन जात असताना आमची मोटारसायकल स्लीप होऊन खाली पडली.
तेवढ्यात सफारी गाडी आमच्या जवळ आली. तीन लोक गाडीतुन खाली उतरुन त्यापैकी दोघे आमचे जवळ आले, त्यातील एकाच्या हातात लोखंडी रॉड, एकाकडे रिव्हॉल्व्हर होते. त्यातील एकाने रॉडने माझ्या उजव्या पायावर मारहाण केली. माझ्या गाडीचे नुकसान केले. मी व माझा जोडीदार हॉटेलमागे पळून जाऊ लागलो तेव्हा सफारी गाडी व पिकअप या दोन्ही गाड्या घेऊन ते टाकळीढोकेश्वरच्या दिशेने निघून गेले. थोडयाच वेळात आमचा मित्र ज्ञानेश्वर विलास आंधळे याने दत्तात्रय यास फोन करुन आमची विचारणा केली दोन्ही गाड्या टाकळी ढोकेश्वर दिशेने गेल्या आहेत, तुम्ही रोडवर या अस फोन आल्यानंतर आम्ही दोघे हॉटेल सप्तमी समोर आलो.
तेवढ्यात बेल्हा येथील आमचे मित्र प्रशांत जालिंदर भंडलकर, तेजस् रामदास पिंगट, विवेक रमेश चव्हाण, गणेश अशोक चाटे, अजिय नागेश पिंगट अनिकेत अनिल शिंदे आले. आम्ही त्यांन झाला प्रकार सांगितल्यानंतर आम्ही स टाकळी ढोकेश्वर दिशेने आलो. तेव्ह रात्री १२.३० वाजण्याच्या दरम्यान सफारी गाडी व पिकअप गाडी नंबर (एमच ०६८ २९७८) ढोकी टोलनायावर थांबल्य होत्या. आम्हास पाहून पिकपअ गाडीवरील चालक पिकअप गाडी तेथेच सोडून पळुन जाऊ लागला. पिकअप गाडीमध्ये पुढे वसीम गुलाबनबी बेपारी व नाजीम कुरेसी असल्याचे प्रशांत भंडलकर याने ओळखले. पिकअप गाडीवरील पळुन जाणारा इसम योगेश मारुती नायकोर्ड असल्याचे सांगितले.
सफारी गाडी घेऊन त्यातील लोक नगरच्या दिशेने पळुन गेले. पाय पोट पोलीसही टोलामा माग र आले. त्यानी विचापुस करुन पिकअप गाडी व त्यातील लोकांना ताब्यात घेतले. सफारी गाडीतून पळून जाणाऱ्यांना प्रशांत मंडलकर याने ओळखले. त्यात मुनाब महबुब बेपारी, फैयाज बेपारी, अफसर बेपारी, कासीम बेपारी (सर्व रा. वेल्हे) असल्याचे सांगितले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय ताकर करत आहेत.