अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-राहुरी बसस्थानक परिसरात अनैतिक धंदे करणाऱ्या महिलांचे टोळके ग्राहकांचा शोध घेत फिरत असते. बसस्थानकासमोर रिक्षांचा अड्डा आहे.
साेमवारी राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान प्रवासात एका रिक्षाचालकाने शेजारी बसलेल्या महिलेशी अश्लील चाळे सुरू केले. रिक्षात मागे बसलेल्या एका अल्पवयीन मुलीसह रिक्षा राहुरी महाविद्यालयाच्या रस्त्याकडे वळवण्यात आली.
त्यामुळे, घाबरलेल्या मुलीने रिक्षा थांबवण्याची विनंती केली. परंतु, रिक्षाचालक व महिलेने तिला रिक्षातून उतरण्यास मज्जाव केला. मुलीने रिक्षा चालत्या रिक्षात उडी टाकून स्वतःची सुटका केली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अज्ञात रिक्षाचालक व महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. काही रिक्षांमध्ये अनैतिक धंदे करणाऱ्या महिलांचे चाळे सुरू असल्याने, इतर प्रवाशांची व महाविद्यालयीन मुलींची कुचंबना होत आहे.