अहमदनगर शहरामधून मोठी बातमी आली आहे. शहरातील प्रसिद्ध सिटी लॉन्सच्या मालकावर मारहाण केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सिटी लॉन्सच्या आवारात सिटी लॉन्सच्या मालकासह तिघांनी एकाला जबर मारहाण केली. नीलेश नानासाहेब नेटके (वय 25 वर्षे, रा.तपोवन रोङ) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.
नीलेश यांनी पोलिसांत सिटी लॉन्सच्या मालकाविरोधात फिर्याद दिली आहे. नीलेश हा डीजे ऑपरेटर म्हणून काम करतो. नीलेश नेटके यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 14 डिसेंबर 2023 रोजी मी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विशाल पालवे यांच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी औरंगाबाद रोडवरील सिटी लॉन्स मध्ये गेलो होतो.
यावेळी साउंड सिस्टीम मुख्य गेटमधून आत नेत होतो. यावेळी सिटी लॉन्सचे मालक (नाव माहीती नाही) तेथे आले. त्यांनी मला शिवीगाळ केली. यावर मी त्यांना तुम्ही कोण आहेत व मला का शिवीगाळ करता असे विचारले.
याचा त्यांना राग आल्याने त्यांनी आमच्या ऑफीमध्ये ये तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हटले. त्यानंतर मी व माझे मित्र विशाल पालवे यांना त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. यावेळी मालकाने मला शिवीगाळ केली. मी काही एक न बोलता गेटकडे मोटारसायकल घेण्यासाठी गेलो.
त्यावेळी ऑफिसमधून सिटी लॉन्सचे मालक व त्यांच्या बरोबर तीन अनोळखी इसम आले. मला मारहाण केली. सिटी लॉन्सचे मालक यांनी फायटरने बेदम मारहाण केली असे म्हटले आहे. या घटनेनंतर नीलेश यांनी पोलिसांत धाव घेतली. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.