अहमदनगर बातम्या

काकडी, शेवगा, लसुण तेजीत ! फळांच्या किंमतीत वाढ ; पालेभाज्या झाल्या स्वस्त

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अनेक दिवसांपासून पालेभाज्यांच्या भावात सतत घसरण होत आहे.काकडी तसेच शेवगा व लसणाच्या भावातही वाढ झालेली आहे.कडधान्याच्याही भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.एकूनच पालेभाज्या उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले आहेत.कमी अधिक प्रमाणात फळांच्या किंमती वाढल्या आहेत.

भाजीपाल्याच्या तुलनेत काही फळांच्या किंमती जशाच्या तशा टिकून आहेत.दोन आठवड्यानंतर पुन्हा थंडी सुरू झाली आहे.याचा परिणाम पालेभाज्यांवर झाल्याने पालेभाज्यांचे बाजारभाव कमी झालेले आहेत.परंतु, बाजारात पालेभाज्यांची आवक मात्र वाढलेली दिसत आहे.

येथील बाजार समितीत मिळालेले दर पुढीलप्रमाणे : टोमॅटो २०० ते १५००, वांगी ५००ते ५०००, फ्लावर, ३०० ते २५००, कोबी ५०० ते २०००, काकडी १००० ते ३५००, गवार १३०० ते ३०००, घोसाळे १५००० ते ३०००, दोडका २००० ते ५०००, कारले १५०० ते ५०००, कैरी २००० ते १८००, भेंडी २००० ते ५५०००, वाल १००० ते ३५००, घेवडा १००० ते ४०००, तांदुळे ३००० ते ३५००, डिंगरी २००० ते ५५००, बटाटे ५०० ते २६००, लसून १७५०० ते २८००, हिरवी मिरची ३००० ते ६८००

पकांडा ५००० ते ६०००, आवळा २००० ते ३०००, शेवगा ३००० ते ६०००, ढेमसे ३००० ते ४०००, लिंबू २००० ते २५००, आद्रक २००० ते ३५००, गाजर १५०० ते २७००, दुधी भोपळा ५०० ते ३०००, मका कणसे ५५०० ते ५५००, शिमला मिरची १००० ते ३६००, मेथी ८०० ते १६००, कोथंबिर ६०० ते २१००, पालक ६०० ते १४००, करडई भाजी ८०० ते १४००, शेपू भाजी १००० ते १४००, पुदीना ३००० ते ३०००

चवळी २००० ते ३५००, बीट २००० ते ३०००, हरभरा १००० ते २२००, वाटाणा २५०० ते ४५००, डांगर ६०० ते २०००, कांदापात १६०० ते २०००, बांलंटी ४००० ते ५०००. त्याच बरोबर मोसंबी १००० ते ७०००, संत्रा १५०० ते २५००, डाळींब २५०० ते २२०००, पपई ४०० ते १२००, सिताफळ २००० ते ६०००, नारळ २००० ते २०००, अननस १९०० ते ५५००, चिकू २५०० ते ४५००, द्राक्षे १००० ते १०००, अॅपल बार ५०० ते ३५००, सफरचंद १००० ते १२०००, पेरू ५०० ते २०००

कलिंगड ४०० ते १०००, खरबुज ४०० ते १०००, कडाळा १५०० ते ४०००, इगण १००० ते ११००, चमेली १२०० ते २५००, खिरणी २००० ते ९०००, केव्ही २००० ते २०००, गावराण बोरं १००० ते ३०००, अॅपल बोरं १००० ते २०००, केळी १२०० ते २३००, स्टोबेरी २००० ते ३५०००, खिरणी २००० ते १००००.

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.

Published by
Mahesh Waghmare

Recent Posts