अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Ahmednagar News : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शनिवारी (९ एप्रिल) अहमदनगर शहर परिसरातील ग्रामीण भागात दिवसभर वीज बंद राहणार आहे.
त्यामुळे नागरिकांची कसोटी लागणार आहे. अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागामध्ये दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
शनिवार हा वीज कंपनीच्या दुरूस्ती देखभालीसाठी वीज बंद ठेवण्याचा दिवस असला तरी सध्या तापमान ४० अंशाच्या पुढे गेलेले अल्याने विजेवाजून नागरिकांचे हाल होणार आहेत.
याशिवाय इतरही कामे रखडण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
त्यानुसार प्रोफेसर कॉलनी चौक, कुष्ठधाम रोड, गावडे मळा, चितळे रोड, कापड बाजार, सर्जेपुरा, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, शहाजी रोड, सावेडी, गुलमोहर रोड, तारकपूर, भिस्तबाग, मार्केट यार्ड, सारसनगर, विनायकनगर, भोसले आखाडा, एमएसईबी कॉलनी, समता कॉलनी, साईनगर, फुलसुंदर मळा, चिपाडे मळा, भवानी नगर, माळीवाडा, हातमपुरा, जुना बाजार, जुने कलेक्टर ऑफिस, जी.पो.ओ ऑफिस, किग्ज गेट, पारशा खुंट, तपकीर गल्ली, अडते बाजार, भूषणनगर या अहमदनगर
शहरातील भागासोबतच कोळगाव,वाळकी, जुने मुकुंद नगर, दर्गादर्या, सीआयव्ही सोसायटी, जेऊर, पांगरमल, उदरमल, धनगरवाडी, बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी, वाघवाडी, पांढरीपूल, खोसपुरी, पिंपळगाव, माळवी, मांजरसुंबे, डोंगरगण, अरणगाव, सोनेवाडी, नारायणडोह या ग्रामीण भागातही वीज बंद राहणार आहे.
तसेच ३३/११ के.व्ही नारायण डोह, भाळवणी, मिरी, गुंडेगाव उपकेंद्रातील सर्व वाहिन्या व त्यावरील परिसराची वीजही बंद राहणार आहे.