अहमदनगर बातम्या

‘दादा’ तुम्ही संगमनेर किंवा राहुरीतून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढा ; कार्यकर्त्यांची डॉ.सुजय विखे यांना साद

Ahmednagar News : नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी पक्षाकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार डॉ. सुजय विखे हे संगमनेर किंवा राहुरी विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत.

जनतेने ठरवल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे देखील सुजय विखे म्हणाले. त्यामुळे ते विधानसभा निवडणूक लढवनार हे निश्चित आहे. मात्र त्यांनी संगमनेर किंवा राहुरीतून नव्हे तर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवावी. अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे यांनी केली आहे.

त्यांनी नमूद केले आहे की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डॉ.सुजय विखे यांचे मोठे संघटन असून त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी आता कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात येत आहे.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात डॉ.सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी रोकडे यांनी केली आहे.

यामध्ये रोकडे यांनी म्हटले आहे की, माजी खासदार सुजय विखे यांचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात मोठा कार्यकर्त्यांचा समूह आहे. परंतु एका मंचावर सर्वांना जमा करून माजी खा. विखे यांनी निवडणूक लढविल्यास सुजय विखे पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार होतील व खऱ्या अर्थाने लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला घेतल्याचे समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येईल.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात खासदार असताना त्यांनी अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. त्या विकास कामांच्या जोरावरच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता त्यांना पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाही.

या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये असलेले एकीचे बळ दाखवून देण्यासाठीच माजी खासदार सुजय विखे यांनी आता मतदारसंघातून आमदारकीला उमेदवारी करणे गरजेचे आहे.

कारण खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व विखे समर्थकांची इच्छा असून सुजय विखे हे जर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात आमदार झाले तर लोकसभेला झालेला पराभव हा खऱ्या अर्थाने बदला ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts