Ahmednagar News : उत्सवामुळे झेंडू, गुलाब, झेंडूची मागणी जास्त आहे. गुलछडी ६०० रुपये प्रतिकिलो आहे. यावर्षी पावसामुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणात व सतत कोसळणाऱ्या पावसाने फुल शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
सध्या सण, उत्सवामुळे मागणी अधिक असल्याने भाव तेजीतच राहतील. गौरी गणपती झाल्यानंतर पुन्हा पितृपक्ष, नवरात्री आणि दिवाळीपर्यंत फुलांना मागणी राहील अशी शक्यता विक्रेत्यांकडून वर्तवली जात आहे.
गौरी, गणेशोत्सवामुळे फुलांची मागणी वाढली आहे. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे फुलांचे नुकसान झाल्याने आवक घडली आहे. परिणामी फुलबाजार तेजीत असून ही तेजी कायम राहण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तवली जात आहे. अहमदनगरच्या बाजारात फुलांची चांगली आवक होत असली, तरी ज्या प्रमाणात मागणी आहे, त्याप्रमाणात फुले मिळत नाही.
यापुढे दिवाळीपर्यंत विविध सण साजरे होणार असल्याने फुलांचे रंग बहरात आले आहेत. सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळू लागला आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पूजेसाठी व सजावटीसाठी ग्राहकांकडून फुलांची खरेदी सुरू आहे. बाजारपेठेत फुलांची मागणी वाढली आहे. आवकच नसल्याने त्यांचे भाव तिपटीने वाढले आहेत.
नगरच्या बाजारात नगर तालुक्यातील अकोळनेर तसेच पारनेर तालुक्यातील कामरगाव, सुपा आदींसह इतर तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते. मात्र यंदा पावसाने फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाबाचे २० फुलांच्या एका बंडलचा भाव १०० ते २०० रुपये आहे.
गुलछडी ६०० रुपये प्रतिकिलो आहे. जाईच्या फुलांचा भाव आकाशाला भिडला आहे. गणेशोत्सवात सर्वच फुलांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
हवामान, पाण्याची उपलब्धता व लागवडीस उपयुक्त असलेली उपलब्ध जमीन यावर या शेतीचे उत्पादन अवलंबून आहे. जिल्ह्यातील शेतकरी फूलशेतीतून उत्पादन घेत आहेत. हरितगृहांमुळे शेतकऱ्यांनाही फूलशेती हा पर्याय खुला झाला आहे.
जिल्ह्यात जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रात फूलशेती केली जात आहे. मात्र विपरीत हवामानामुळे या फुलांवर परिणाम होतो.