Ahmednagar News : शहरातील मध्यवर्ती असलेले, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याचे नवे साहेब पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी चार्ज घेतल्यापासून अवघ्या आठवडाभरातच मोठे फेरबदल केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीत महत्त्वाचे समजले जाणाऱ्या ‘डीबी’ अर्थात डीटेक्शन ब्रँचमध्ये मोठी उलथापालथच केली आहे. जुन्या-नव्यांचा मेळ साधला आहे.
डीबी’चा चार्ज यापुढे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे असणार आहे. आत्ता नव्याने रवींद्र टकले, संदीप पितळे, संगीता बडे, तान्हाजी पवार, सत्यजीत शिंदे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिवाजी मोरे, सूरज कदम यांना संधी देण्यात आली आहे.
तन्वीर शेख, अविनाश वाकचौरे, सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे यांना पुन्हा नेमणूक मिळाली आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्थापन केलेले चार जणांचे गुन्हे तपास पथक बरखास्त करण्यात आले आहे. या पथकातील तीन कर्मचान्यांना ‘डीबी’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. शाहीद शेख, दीपक रोहोकले, प्रमोद लहारे अशी त्यांची नावे आहेत.
पोनि संपत शिंदे, पोनि चंद्रशेखर यादव यांच्या कार्यकाळात ‘डीची’ पथकात असलेले योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, ए.पी. इनामदार, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे या सहा जणांना पथकातून वगळण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे केडगाव चौकीचा भार सपोनि महेश जानकर, मार्केट यार्ड चौकी पोसई शितल मुगडे, माळीवाडा व आनंदी बाजार पोसई सुखदेव दुर्गे, गंज बाजार व झेंडीगेट सपोनि योगीता कोकाटे यांना सोपविण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनही पोसई प्रवीण पाटील यांच्याकडे असेल अशी माहिती मिळाली आहे.