अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यासाठी शनिवार व रविवार घातवार ठरला. विविध घटनांमध्ये सहा व्यक्तींचा मृत्यू झाला.
बेलापूर ते चितळी रेल्वेस्टेशन दरम्यान २५ वर्षांच्या युवकाचा व पढेगाव रेल्वेस्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीचा रेल्वेखाली मृत्यू झाला.
रविवारी सकाळी शहरातील वाॅर्ड १ मधील डबके पेंटरसमोर राहणाऱ्या रोहिणी दीपक आरोरा (३०) या सकाळी ८ च्या सुमारास शिवाजी चौकातून जात असताना त्यांना मालट्रकची (एमएच १७ के ८२११) पाठीमागून धडक बसली.
दोन्ही पायांवरून चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी त्यांना तत्काळ साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दीपक आरोरा यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी अशोकनगर येथे गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. सुपे येथील अपघातात दोघांचा अपघाती मृत्यू झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com