अहमदनगर बातम्या

कोरोनाचा धोका असतानाही नगरकरांची लसीकरणाकडे पाठच; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाची लाट ओसरत असताना कोरोनाचा नवा अवतार ओमिक्रॉनने ऍट्री केली आहे. यामुळे राज्यासह जिल्ह्यात देखील लसीकरण मोहिमेवर पुन्हा एका भर देण्यात येत आहे. (Omicron Virus)

या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे नगर जिल्ह्यात अद्यापही साडेआठ लाख लोकांनी एकही लसीचा डोस घेतलेला नाही.

करोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन समोर आला आहे. सध्या देशासह महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण समोर येत आहे. त्याचा परिणाम लसीकरणात काही दिवस पुन्हा वाढ झाली.

आठवडाभर लसीकरणाचे प्रमाण वाढले. परंतु Omicron variantची भीती कमी होताच लसीकरणाचा वेगही मंदावला. सध्या जिल्ह्यात 20 ते 25 हजार जणांचे लसीकरण रोज होत आहे.

मागील आठवड्यात हा आकडा 40 ते 45 हजारांपर्यंत वर होता. जिल्ह्यात 36 लाख लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 27 लाख 62 हजार जणांनी पहिला डोस, तर 14 लाख 24 हजार जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

मात्र, अजूनही 8 लाख 41 हजार लोकांनी एकही डोस घेतलेला नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडील आकडेवारीवरून ही बाब समोर आलेली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts