Ahmednagar News : विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनचे कृषि महाविद्यालय व उत्तरप्रदेश येथील टेस्टबुक एज्यु सोल्युशन प्रा. लि. यांचेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सामजस्य करार करण्यात आलेला आहे.
यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, सरळसेवा परीक्षा, प्रशासकीय सोबतच वनविभागातील स्पर्धात्मक प्रशिक्षण आणि आयबीपीएस बँकीग इतर क्षेत्रात संधी असणा-या विविध परीक्षाचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यामध्ये मॉकटेस्ट, टेस्टसीरीज घेण्यात येणार असून त्याव्दारे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील पर्याय निवडण्याची संधी देण्यात येणार आहे व नंतर त्या अनुषंगाने तज्ञाचे मार्गदर्शन व व्याख्यान आयोजीत केले जाणार आहे.
सद्या १ वर्षाकरीता विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या करारावर टेस्टबुक एज्यु सोल्युशन प्रा. लि.,चे श्री. अशिष वाडेकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे यांनी स्वाक्ष-या केल्या आहेत.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धोंडे म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम, अभ्यासात सातत्य, जिद्द,चिकाटी या गोष्टी महत्वाच्या असून स्पर्धेच्या युगात प्रशिक्षणाव्दारे सातत्य ठेवून आपले स्वप्न पूर्ण करावीत.
तसेच विद्यार्थ्यांनी या ऑफलाईन/ऑनलाईन कोर्सचा फायदा नियमित अभ्यासकम सांभाळून उचित ध्येय पूर्ण करण्यासाठी नक्कीच होईल. असे डॉ. धोंडे म्हणाले.
या उपक्रमास महाराष्ट्र राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रभारी सेक्रेटरी जनरल डॉ. पी.एम. गायकवाड, उपसंचालक (तंत्र) प्रा. सुनिल कल्हापुरे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.