अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली… महिला ठार; चार जखमी

Ahmednagar News:भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. राजश्री विजय पाटील (नाशिक) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

हा अपघात संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात घडला. याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक येथील रहिवाशी असलेले विजय नारायण पाटील, राजश्री विजय पाटील, चिन्मयी विजय पाटील, वनिता राजेश कुलकर्णी,

आदिती राजेश कुलकर्णी हे सर्व आपल्या वॅगनआर कारमधून पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होते. ते संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात आले असता अचानक कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली.

त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात, कारमधील राजश्री विजय पाटील (वय ४६) यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातातील जखमींना संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts