अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने एका मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटला, अन तो ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
ही घटना राहुरी-मांजरी रस्त्यावर मानोरी परिसरात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी, बुधवार रात्रीच्या दरम्यान कोपरगावहून मानोरीकडे सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा ( एम.एच.१६ सी.ऐ. ६५७७) हा मालवाहतूक ट्रक हा ठुबे वस्ती नजीक आला असता
चालकास अंधारात रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका शेतात हा ट्रक घुसला व पलटी झाला. यावेळी ट्रकमधील एक महिला व चालक बालंबाल बचावले आहेत. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.