अहमदनगर बातम्या

‘दुष्काळ व कर्जमाफी’मुळे जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीत घट; जून अखेर अवघी ‘इतकी ‘ झाली वसुली

Ahmednagar News : आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक असा नावलौकिक असलेली बँक म्हणून अहमदनगर जिल्हा बँकेची ओळख आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून या बँकेच्या कर्ज वसुलीचे प्रमाण कमी होत आहे.

यापूर्वी ही वसुली दरवर्षी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्जाची वसुली होत होती मात्र मागील दोन वर्षांपासून बँकेच्या वसुलीमध्ये मोठी घट होतांना दिसत आहे. चालूवर्षी ३० अखेर अवघी ५८.३४ टक्के वसुली झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल २० टक्के घट झाली आहे.

मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे खरीपासह रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन घटले. त्यामुळे सरकारकडून कर्जमाफी होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परिणामी कर्ज परतफेड करणाऱ्याकडे शेतकऱ्यांनी कर्जफेड करण्यास दुर्लक्ष केल्याने वसुली कमी झाली आहे. तर दुसरीकडे यंदा जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी आतापर्यंत ७९ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे.

जिल्हा बँक थेट शेतकऱ्यांना कर्ज वितरण न करता गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यामार्फत हे कर्ज वाटप होते.त्यामुळे अल्प, मध्यम व दिर्घ मुदतीच्या कर्जाची यंदा २ हजार १३५ कोटी रुपये थकबाकी असली तरी ही सेवा सोसायट्याकडे आहे. मात्र आतापर्यंत थकबाकी ही सोसायट्यांकडे मोठी असून ती ५ हजार ८३५ कोटीवर गेली आहे. त्यामुळे जिल्हा बँके पुढे हे मोठे आव्हान आहे.

२०२३-२०२४ या आर्थिक वर्षात अल्प मुदत (पीक कर्ज), मध्यम मुदत व दिर्घ मुदत या तीन कर्जवाटप प्रकरणातून जिल्हा बँकेला ३० जून अखेर ५ हजार १२६ कोटी वसुली होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात २ हजार ९९० कोटी वसुली झाली असून २ हजार १३५ कोटी थकबाकी राहिली आहे.

जिल्हा बँकेने सेवा सोसायट्यामार्फत गेल्यावर्षी ४ हजार ६०२ कोटी पीककर्जाचे वाटप केले होते. त्यापैकी २ हजार ६०० कोटी वसुली झाली आहे.

तर दोन हजार कोटी थकबाकी आहे. पीक कर्जाची मोठी थकबाकी आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही कर्जमाफी मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागल्याने त्यांनी पीककर्जाची परतफेड करणे टाळल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा बँकेने यंदाच्या खरीप हंगामात १ हजार ९०४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. बँकेला यंदा खरीपासाठी २ हजार ४०५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ९०४ कोटी रुपये वाटप झाले आहे. त्यात २ लाख ३० हजार ९०७ शेतकरी सभासदांना १ लाख ९३ हजार ३६३ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी हे कर्ज वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत ७९ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts