अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : दुष्काळाने तूर उत्पादन घटले, एकरी निघतंय फक्त पाच क्विंटल उत्पन्न

Ahmednagar News : यंदा पावसाने सगळीकडेच हात आखडता घेतला. त्यामुळे खरिपातील पिकांवर मोठा परिणाम झाला. पाणीसाठा कमी असल्याने रबीतही पिकांना पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. याचा परिणाम तूर उत्पादनावरही झाला आहे.

कमी पाणी असल्याने तुरीचे पीक लवकरच काढणीला आले आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तूर काढणी सुरु आहे.

उत्पन्न घटले, उताराही कमीच

दुष्काळी स्थितीमुळे तुरीचे पीक लवकरच काढणीला आले. कमी पाण्याने यंदा तुरीला कमी उतारा मिळतोय. एकरी पाच ते सहा क्विंटल तूर सध्या होत आहे. हे पाहून शेतकरी मात्र हतबल झालाय.

बहुतेक ठिकाणी शेतक-यांनी तीन फुट अंतरावर अशी पेरणी केली होती. पावसाने हुलकावणी दिल्याने तुरीलाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला. सध्या शेतकरी मोठ्या मशीनद्वारे तूर करण्याऐवजी तुरीची कापणी करून छोट्या मशीनद्वारे तूर करत आहेत. त्यामुळे सध्या तूर कापणीसाठी तीनशे रुपये रोजंदारी द्यावी लागत आहे.

तुरीला कमी उतारा मिळत असून एकरी पाच ते सहा क्विंटलचेच उत्पादन मिळत आहे. तुरीचे बियाणे, पेरणी, खतव्यवस्थापन, तण व्यवस्थापन, खुरपणी, कापणी, मशीनद्वारे करणे आणि मिळालेले उत्पादन यांचा मेळ बसणे अवघड झाले आहे. त्यामुळे तुरीचे उत्पन्न यावर्षी तोट्यात गेल्याचे शेतकरी म्हणत आहेत.

पैसा हातात राहीना

सध्या शेतकऱ्याचा खर्च अमाप आहे. अगदी पेरणीपासून तर काढणीपर्यंत साधारण एकरी १५ ते २० हजारांपर्यंत खर्च येत आहे. त्यात आता एकरी पाच क्विंटल उतारा पडत आहे. त्यामुले शेतकऱ्याच्या हातात म्हणावा तसा पैसा राहत नाहीये.

कांद्यानेही केली निराशा

अनेक शेतकऱ्यांना कांद्याकडून अपेक्षा होती. परंतु निर्यातबंदी नंतर कांदा अगदीच कोसळला. कांदा सध्या १२ ते १५ रुपये किलोप्रमाणे मार्केटमध्ये जात आहे. त्यामुळे तेथेही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts