अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे. याच नवीन कामगार कायद्याविरोधात देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती.
या देशव्यापी संपात महापालिकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने झाडूकामासह अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज गुरूवारी दिवसभर ठप्प होते.
युनियनने मनपात कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भूमिका हि मांडली होती. महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाशी कामगार युनियन संलग्न असून, संघाने मनपाला रितसर नोटीस दिली आहे.
पाणीपुरवठा, अग्निशामक व दवाखाने आदी सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान काही दिवसांपूर्वी नवीन कामगार कायद्याची अमलबजावणी करण्यात आली. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय, हमाल पंचायत, कारखान्यातील कामगारांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला. सफाई कामगारही सहभागी झाल्याने स्वच्छता होऊ शकली नाही.
युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी सकाळी मनपात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिका मांडली.
लोखंडे म्हणाले, सरकारने केलेले कामगार नवीन विरोधी कायदे मागे घ्यावेत.राज्य सरकारने संपात सहभागी होऊ नये, असे फर्मान काढले आहे, त्या आदेशाचाही निषेध करण्यात आला.
कामगाराची वाताहत होत असताना ही भूमिकाच कामगार विरोधी आहे. सरकारने हिम्मत असेल, तर कारवाई करून दाखवावी, असे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved