अहमदनगर बातम्या

ढगाळ हवामानामुळे पिकांवर होतोयं रोगाचा प्रादुर्भाव ! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषध फवारणी

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे नगदी पीक म्हणजे कांद्याचे पीक. या पिकाची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा लागवड जरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली असली पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर,

कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, ढवळेवाडी, पाडळी परिसरात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणारे धुके, यामुळे कांदा पिकांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

यंदा पाऊस कमी पडल्यामुळे उसाच्या लागवडीचे प्रमाण कमी झाले असून, शेतकरी चार महिन्यांच्या कांदा पिकाकडे वळले आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांना यंदा कांदा लागवड केली; परंतू पीक वाचवताना शेतकयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कधी कडाक्याची थंडी तर कधी पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे कांदा पिकावर भुरी रोगाचा दिसून येत आहे. परिसरात ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

ओलिताखाली असणारी सर्व शेतीत हवामानामुळे सतत बदल होत असतात. शिवारात पाणी असल्यामुळे दव मोठ्या प्रमाणात पडते. कधी टिपटिप पाणी पडणारे धुके, तर कधी कोरडे धुके, यामुळे पिकांवर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो.

कांदा उत्पादन घटण्याची शक्यता

कांदा पिकाला लागवड करण्यासाठी बियाणे, जमीन मशागत, लागवड खर्च, खते, औषध फवारणी, असा एकरी जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो. त्यात शासनाच्या निर्यातबंदीच्य धोरणामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चसुद्धा वसूल होत नसल्याने कांदा पीक वर्षानुवर्षे तोट्यात जात आहे. लाल कांदा हा पावसाळ्य लागवड केल्यामुळ फारसे उत्पादन निघत नाही उन्हाळ कांद्याचे काही प्रमाणात जास्त उत्पादन निघते; परंतू सतत होणान्य हवामानातील बदलामुळे यंदा उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts