अहमदनगर बातम्या

बिबट्याच्या वाढत्या वावराने येथील नागरिक जगतायत दहशतीखाली…

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर दत्तनगर परिसरासह शहराच्या लोकवस्ती असलेल्या पूर्णवादनगर भागात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत परिसर्फातील दोन बकरं फस्त केेले.(leopard news) 

त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात तालुक्यातील मोरगे वस्ती, रेणूका देवी मंदिर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या हल्ल्यात बिबट्याने सात जणांना जखमी केले होते.

यातील एका वन अधिकार्‍याचा मृत्यूही झाला. यात बिबट्याला पकडण्यात यश आले असले तरी परिसरात आणखी काही बिबटे वावर करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.

दोन दिवसांपूर्वी दत्तनगर भागात बिबट्याला काही लोकांनी पाहिले होते. त्यानंतर काल रात्री शहरातील पूर्णवादनगर परिसरातील म्हसोबा चौक येथे मध्यस्तीत बिबट्याने सायरा कादरी यांच्या मालकीच्या बकरांवर हल्ला करून ते फस्त केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका ठिकाणी शेळी फस्त केली. सध्या तालुक्यात बर्‍याच ठिकाणी बिबट्याचा संचार वाढला आहे. तसेच काही महिन्यापूर्वी शहरातील सुर्यानगर भागात बिबट्याने काही लोकांना दर्शन दिले.

यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसविला होता. बिबट्याने त्या पिंजर्‍यात यावे म्हणून शिकारीसाठी बोकडही ठेवला होता. मात्र अज्ञात चोरट्याने तो गायब केला मात्र पिंजरा तसाच आजही बिबट्याची वाट पहात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts