अहमदनगर बातम्या

दिवसा मोटारसायकलवर फिरून एकांतातली वस्ती हेरायची अन रात्री दरोडा टाकायचे … तब्बल १५ ठिकाणी टाकले दरोडे

Ahmednagar News : काहीजण दिवसा मोटारसायकलवर फिरून परिसरातील एकांतातली वस्ती हेरायची अन रात्री सर्वजण मिळून त्या वस्तीवर दरोडा टाकायचे. यावेळी सर्व आपापले मोबाइलला बंद करत, तसेच कोणी मदतीला येऊ नये यासाठी आजूबाजूच्या घरांना बाहेरून काड्या लावत असत. असा चोरीचा फंडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला वाकळे वस्ती, माळीबाभुळगाव परिसरातुन अटक केलेल्या दरोडेखोरांनी सांगितली.

दरम्यान नुकतेच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील ससाणे वस्तीवर मच्छिंद्र तुकाराम ससाणे हे त्यांचे राहते घरी झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या गोठयातील शेळया व कोंबडया चोरी करीत असताना मयत मच्छिंद्र ससाणे त्यांनी आरोपीस प्रतिकार केला. म्हणुन त्यांच्या डोक्यात काहीतरी धारदार हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारले होते. याबाबत पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार राम माळी, विश्वास बेरड, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, पंकज व्यवहारे, शरद बुधवंत, संदीप दरंदले, संतोष खैरे, राहुल सोळुंके, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, मयुर गायकवाड, उमाकांत गावडे, महादेव भांड यांचे तीन पथके नेमुन गुन्हा उघडकिस आणण्याबाबत दिल्या होत्या.

त्यानुसार या पथकाने आरोपी हे मोटार सायकलवरून आल्याचे निष्पन्न केले.त्यानंतर तपास पथकाने घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करून, तिसगाव पासुन अहमदनगर, मिरी, शेवगाव व पाथर्डी अशा रोडच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच घटना घडलेल्या वेळीपासुन तांत्रीक विश्लेषण करून ३ मोटार सायकलवरून १० आरोपी तिसगाव पाथर्डी रोडने गेल्याचे तपासात निष्पन्न केले.

सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीत इसमांचे फोटो गुप्त बातमीदारांना पाठवून गुन्हा करणाऱ्या आरोपींची ओळख पटविण्यात आली होती. ओळख पटविण्यात आलेल्या आरोपींचा शोध घेत असताना असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वाकळे वस्ती येथे जाऊन खात्री करता एका पालाजवळ ८ ते १० इसम बसलेले दिसले. पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयीत इसम पोलीस पथकास पाहुन पळून जाऊ लागले. पथकाने त्यापैकी ६ इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना ताब्यात घेत त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव उमेश रोशन भोसले (रा.साकेगाव, ता.पाथर्डी) दौलत शुकनाश्या काळे (रा.माळीबाभुळगाव, ता.पाथर्डी) सिसम वैभव काळे (रा.माळीबाभुळगाव, ता.पाथर्डी ) शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले( रा.साकेगाव, ता.पाथर्डी ) आकाश उर्फ फय्याज शेरू उर्फ लोल्या काळे (रा.बाभुळगाव, ता.पाथर्डी ) विधी संघर्षित बालक, असे सांगीतले.

त्यांचेकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार सेशन उर्फ बल्लु रायभाण भोसले (रा.साकेगाव,ता.पाथर्डी) (पसार ) बेऱ्या रायभान भोसले, (रा.साकेगाव, ता.पाथर्डी) (पसार) आज्या उर्फ बेडरुल सुरेश भोसले (रा. टाकळीफाटा, ता.पाथर्डी) (पसार ) लोल्या उर्फ शेरू सुकनाश्या काळे (रा.माळी बाभुळगाव, ता.पाथर्डी), (पसार ) आदींसह गुन्हा केल्याचे सांगीतले.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपींना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी तसेच इतर साथीदार हे मोटार सायकलवर जाऊन एकांतातली वस्ती पाहुन व शेजारील घरांना कडया लावून ज्या घरात वयस्कर लोक झोपलेले असतील प्रथम त्यांना मारहाण करून त्यांचे जवळील दागीने हिसकावून घेत.

तसेच घटनेच्या वेळी ते सर्व मोबाईल बंद करत असल्याने तपासात अडचणी येत होत्या.अशा प्रकारे त्यांनी शेतामधील असणाऱ्या वस्तीचे घराचे दरवाजा तोडून, रस्ता आडवून शेवगांव तालुक्यातील बोधेगांव, घोटण, शेकटे या ठिकाणी, पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, चांदगांव, जांभळी, शेकटे, दुलेचांदगांव, महिंदा, तिसगांव, सुसरे या ठिकाणी तसेच मिरजगांव, ता. कर्जत, व मातोरी, ता. शिरुर कासार, जि. बीड येथील खालील प्रमाणे मालाविरूध्दचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने एकुण १५ गुन्हे उघडकिस आलेले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts