अहमदनगर बातम्या

खा. डॉ. सुजय विखे व कुटुंबिय कोरोना मुक्त होण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यानी केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- अहमदनगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर कोरोनाचे संकट ओढवले आहे.

त्यातून त्यांची सुखरूपपणे सुटका व्हावी आणि ते लवकर बरे व्हावे यासाठी कर्जत येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी श्री संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते.

विखे कुटुंबीयांसह महाराष्ट्र व देशावरचे कोरोनाचे संकट टळू दे..! असे साकडे भाजपाच्या पदाधिकार्‍यांच्यावतीने श्री संत सदगुरु गोदड महाराज यांना घालण्यात आले.

कर्जत येथील प्रसिद्ध उद्योजक अरविंद काळोखे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. महाआरतीसाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,

युवा नेते दादासाहेब सोनमाळी, भाजपा किसान मोर्चाचे सुनिल यादव, काकासाहेब धांडे, दिग्विजय देशमुख, गणेश क्षीरसागर, अनिल गदादे, चंदन भिसे, रावसाहेब खराडे, विनोद दळवी, डॉ. संदीप बरबडे, सागर कांबळे, काका ढेरे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts