अहमदनगर बातम्या

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘मैं हू डॉन..’ गाण्यावर धरला ठेका..

Ahmednagar News : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला. शेवगाव येथील खंडोबा मैदानात संपन्न झालेल्या या सोहळ्यास महिलांनी तुफान गर्दी करत या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

यावेळी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी उत्सवमूर्ती महिला भगिनींचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित असंख्य महिलांना योग्य ते मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.

या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामधे महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि अनेक महिला या आकर्षक बक्षिसांच्या मानकरी देखील ठरल्या.

या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी आपल्या आवाजाच्या जादूने उपस्थितांची मने जिंकली. तसेच अभिनेत्री अमृता खानविलकर देखील आपल्या नृत्यातून प्रेक्षकांवर भुरळ घातली. यासोबतच महाराष्ट्राचे हास्यवीर सुनील पाल, रोहित माने आणि शिवाजी परब यांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांच्या मनात स्थान निर्माण केले.

अतिशय मनोरंजनात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होत असणाऱ्या या कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील ‘मै हु डॉन..’ या गाण्यावर ठेका धरत उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला.

सदरील कार्यक्रमात कोरोना काळात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. विजया फळके, कृषी खात्यातील अधिकारी या नात्याने शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणाऱ्या सविता सानप, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणाऱ्या उषाताई होळकर,

झाडू कामगार असूनही मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या पवित्राबाई कुसळकर, शिक्षणाप्रती समाजजागृती करणाऱ्या कमरूनिसा सालार शेख, समाजसेवेसाठी नेहमी पुढे असणाऱ्या शामा गांधी, प्रामाणिकपणे एसटी बस वाहक म्हणून सेवा देणाऱ्या सुवर्णा देवकाते,

महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविणाऱ्या सुवर्णा टाकळकर, अश्विनी काकडे आणि रूपाली सरोदे, पार्लरचा व्यवसाय करून यामध्ये महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या सीमा लाहोटी, समुदाय संसाधन व्यक्ती (ICRP) म्हणून असंख्य महिलांना सीआयएफ (CIF) निधी उपलब्ध करून देणाऱ्या सविता भुजबळ, अश्विनी काकडे आणि सुवर्णा टाकळकर आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts