कर्जतमधील ‘त्या’ गाळेधारकांना खा. सुजय विखे यांचा दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केल्यास या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गाळेधारकांना विस्थापित व्हावे लागेल. मागील पन्नास वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची रोजीरोटी जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

या लोकांना खा. सुजय विखे यांनी दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यांनी यासाठी बाह्यवळण रस्त्याचा पर्याय सुचविला असून सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्यायी बाह्यवळण रस्त्याचे सर्वेक्षण व आखणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार रस्त्याचे सर्वेक्षण सुरू होईल व गाळेधारकांच्या डोक्‍यावरची टांगती तलवार कायमची दूर होईल. नगरपंचायत हद्दीतील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालय पर्यंतचा रस्त्याच्या बाजूला

गाळेधारक सुमारे पन्नास वर्षापासून व्यवसाय करीत आहेत. गाळे जमीनदोस्त झाले तर सुमारे 300 पेक्षा जास्त गाळेधारक आणि त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील.

ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन खासदार डॉ. सुजय विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला बाह्यवळणं रस्ताचे प्रस्ताव तयार करण्यासाठी सूचना केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts