अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- केवळ निवडणुकीत निवडून येऊन नगरसेवक होणे हा उद्देश नसावा, ज्या नागरिकांनी निवडून दिले, त्यांचे प्रश्न सोडविणे हे कर्तव्य समजावे. प्रभाग 2 च्या नगरसेविका संध्याताई पवार, रुपालीताई वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे यांनी या मोठ्या प्रभागाचे महत्वाचे प्रश्न सोडवून विकास कामांसाठी भरीव निधी घेऊन त्याचा विनियोग चांगला केला, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
पाईपलाईन रोडवरील समर्थनगरमध्ये आरसीसी बंद गटार पाईप योजनेचा शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश खरपुडे, विशाल कार्ले, बबनराव हापसे,
राजेंद्र गर्गे, सचिन ठोसर, राजळे सर, अॅड.पालवे, डॉ.पोतनिस, श्री. जहागिरदार, श्री.लंके, श्री.निंबाळकर, तसेच सौ.चोभे, सौ.गावडे, सौ.रासकर, सौ.खामकर, सौ.धकाते, सौ.होनराव, सौ.जाधव आदिंसह नागरिक उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले, मी निधी देण्याचे काम केले, त्याचा चांगला विनियोग करण्याचे काम या नगरसेवकांनी केले. आज उपनगर कचराकुंडी मुक्त केले. लवकरच स्ट्रीट लाईटचा प्रश्न सुटेल. उपनगरातील पाईप लाईन रोड,
गुलमोहोर रोड, भिस्तबाग चौक रस्त्यांचे कॉक्रीटीकरण होईल. समर्थनगरच्या नागरिकांच्या घरात घुसणार्या पावसाच्या पाण्याचा व ड्रेनेजचा प्रश्न आता मिटला आहे, असे ते म्हणाले. प्रास्तविकात बाळासाहेब पवार यांनी या कॉलनीचा पाणी निचरा होण्याचा प्रश्न 20 वर्षांपासून भिजत-घोंगडत पडला होता.
आ.जगताप यांच्या सहकार्यामुळे आम्ही चारही नगरसेवकांनी पाठपुरावा करुन अखेर मार्गी लागला. प्रभागातील प्रश्नांसाठी आम्ही दक्ष राहून लक्षपूर्वक काम करुन तो सोडवितो. नागरिकांच्या सहकार्यामुळे विकास कामाला चालना मिळते, असे श्री.पवार यांनी सांगितले. आभार मानतांना नागरिकांनी सांगितले की,
आ.संग्राम जगताप यांचे शहर विकासाला चांगले नेतृत्व लाभले आहे. पावसाचे पाणी दरवर्षी घरात शिरायचे, आता हा प्रश्न जगताप यांच्या सहकार्यामुळे व चारही नगरसेवकांच्या पाठपुराव्याने कायमस्वरुपी निकाली लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
निखिल वारे यांनी यावेळी सांगितले की, प्रभागात कोट्यावधी रुपयांची विकास कामे सर्व भागांमध्ये सुरु आहेत. प्रभाग 2 मध्ये सर्व मुलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध आहोत. यावेळी सचिन लोटके, हर्षल विधाते, प्रसाद साळी, झहिर शेख, मुन्ना सय्यद आदि उपस्थित होते.